“नवी मुंबईत भाजपचा विकास जागर – हाजी अरफात शेख यांच्या सभेला मुस्लिम समाजाचा मोठा प्रतिसाद”
नवी मुंबई :
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार – शुभांगी पाटील, शशिकला पाटील, उषा पुरुषोत्तम भोईर आणि रामचंद्र घरत यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व माजी अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी नवी मुंबईत भव्य प्रचार दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे जनतेला ठाम आवाहन केले.
या सभेत बोलताना हाजी अरफात शेख यांनी नवी मुंबईच्या विकासामागे मंत्री गणेश नाईक यांच्या दूरदृष्टीचा मोठा वाटा असल्याचे अधोरेखित केले. “गणेश नाईक म्हणजे विकास. सर्वधर्म, सर्वसमाजाला सोबत घेऊन चालणारे, शांत, संयमी आणि नम्रपणे जनतेची सेवा करणारे हे नेतृत्व आहे,”
नवी मुंबईला स्वतःचे धरण, मुबलक पाणीपुरवठा, स्वच्छ व सुंदर शहर, मजबूत पायाभूत सुविधा आणि आधुनिक महानगर बनवण्याची दिशा मंत्री गणेश नाईक यांनीच दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “जर आपल्याला खरोखरच स्वच्छ, सुंदर आणि विकसनशील नवी मुंबई हवी असेल, तर शुभांगी पाटील, शशिकला पाटील, भोईर उषा पुरुषोत्तम आणि रामचंद्र घरत या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करणे फार गरजेचे आहे. भाजप म्हणजे विकास, भाजप म्हणजे विश्वास,”
असे आवाहन हाजी अरफात शेख यांनी केले.
हाजी अरफात शेख यांनी गणेश नाईक कुटुंबाशी असलेल्या आपल्या कौटुंबिक आणि भावनिक नात्याचाही उल्लेख करत सांगितले की हे कुटुंब नेहमीच जनतेच्या हितासाठी काम करत आले आहे.
या प्रचार सभेला नवी मुंबईतील सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः मुस्लिम युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक हाजी अरफात शेख यांचे भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने हजर होते. या सभेमुळे मुस्लिम समाजातही भाजपबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले. आपणही सरकारमध्ये आहोत, आपल्यालाही विकास, न्याय आणि संधी मिळू शकते,”
हा आत्मविश्वास या सभेतून समाजात निर्माण झाला.
सभेच्या शेवटी हाजी अरफात शेख यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की “नवी मुंबईचा विकास गप्पांनी नाही तर ठोस कामाने होतो. भाजप सरकार म्हणजे पारकदर्शकता, गती आणि जनतेचा विश्वास असल्याची माहिती हाजी अरफात शेख यांनी आपल्या भाषणातून दिली.KK/ML/MS