प्रभाग क्र.208 शिवसेना उमेदवार विजय दाऊ लिपारे यांना मिळतोय प्रचंड प्रतिसाद
मुंबई, दि. १२
शिवसेना,भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आरपीआय मित्रपक्ष महायुतीच्या प्रभाग क्रमांक 208 मधील शिवसेना उमेदवार विजय लिपारे यांच्या प्रचाराला घोडपदेव येथे ठीक ठिकाणी जल्लोषात उदंड प्रतिसाद मिळत आहे.
विजय लिपारे यांनी प्रभागात केलेल्या कामामुळे स्थानिक नागरिक आणि महिलांनी त्यांचे मनापासून स्वागत करून त्यांची आरती आणि ओवाळणी करून त्यांचे स्वागत करत आहे.
आम्ही प्रभागातील नागरिकांच्या अनेक समस्या सोडवले आहेत. माजी आमदार यामुळे यादव यांच्या माध्यमातून आम्ही प्रभागात ठिकठिकाणी इमारतींचे दुरुस्तीचे काम तसेच अनेक ठिकाणी सामाजिक आणि लोकोपयोगी कामांना आमदारकीचा निधी दिला आहे. त्यामुळे प्रभागातील अनेक काम आमच्या माध्यमातून झालेली आहे. तसेच शिवसेना भाजपा सरकार मधील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही घरोघरी पोहोचवली असून प्रत्येक महिलेला आम्ही पंधराशे रुपये चा निधी त्यांच्या खात्यात जमा केलेला आहे. प्रसंगी आम्ही त्याच्यासाठी ऑनलाईन फॉर्म तसेच केवायसी सुविधा देखील आम्ही प्रत्येक शाखेमध्ये उपलब्ध करून दिली होती. त्याचप्रमाणे विभागातील महिला आणि तरुणींसाठी आम्ही विविध प्रकारचे कोर्सेस चे देखील आयोजन केले होते. या कोर्सच्या माध्यमातून अनेक महिला आपल्या पायावर उभे राहिले आहेत. त्यांना त्यांचा हक्काचा रोजगार मिळाला आहे. याचा आम्हाला मोठ्या प्रमाणात समाधान आहे. प्रभागातील अनेक कामदेखील करायची आहे त्यासाठी मी विभाजन नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी माझ्यापाठी ठामपणे उभे राहावे आणि आम्हाला निवडून द्यावे. आपण माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची ग्वाही मी तुम्हाला आज या ठिकाणी देतो अशी माहिती शिवसेनेचे उमेदवार विजय दाऊ लिपारे यांनी दिली.ML/ML/MS