मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शुद्ध गावरान गुळाची वाढली मागणी…
वाशीम दि ११ : वाशीम जिल्ह्यात मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गावरान गुळाच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील रिधोरा परिसरात सेंद्रिय आणि पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या शुद्ध गावरान गुळासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. संक्रांतीसाठी आवश्यक असलेल्या तिळगुळासाठी यंदा ग्राहकांचा कल बाजारातील प्रक्रिया केलेल्या गुळाऐवजी नैसर्गिक, रसायनमुक्त गावरान गुळाकडे अधिक झुकलेला दिसून येत आहे. या वाढत्या मागणीमुळे ग्रामीण भागात तयार होणाऱ्या गुळाला प्रतिकिलो ५० ते ६० रुपये दर मिळत असून, गुळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे अनेक ग्राहक थेट शेतकऱ्यांच्या गुऱ्हाळावर जाऊन गूळ खरेदी करत असल्याने मध्यस्थांचा खर्च टळत असून शेतकऱ्यांना थेट फायदा होत आहे.ML/ML/MS