प्रभाग क्र.197 मध्ये शिवसेनेच्या वनिता नरवणकर यांच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई प्रतिनिधी
शिवसेना,भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आरपीआय मित्रपक्ष महायुतीच्या प्रभाग क्रमांक 197 मधील अधिकृत उमेदवार वनिता दत्ताराम नरवणकर यांच्या प्रचाराला वरळी येथील महालक्ष्मी रेसकोर्स येथे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.
शिवसेनेच्या उमेदवार वनिता नरवणकर यांचे पती माजी नगरसेवक दत्ताराम नरवणकर यांनी प्रभागात केलेल्या कामामुळे स्थानिक नागरिक आणि महिलांनी वनिता नरवणकर यांचे जल्लोषात स्वागत करून त्यांची आरती आणि ओवाळणी केली. माजी नगरसेवक दत्ता नरवणकर हे शिवसेनेचे वरळी विभागाचे विभाग प्रमुख आहेत. त्यांनी शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम केले असून प्रभागात त्यांचे कामाचा फार मोठ्या प्रमाणात दबदबा आहे. त्यांच्याच कामाचा मोबदला हा वनिता नरवणकर यांना मिळणार अशी प्रभागात चर्चा आहे. आम्ही 24 तास प्रभागातील नागरिकांसाठी उपस्थित असतो. माझे गांधीनगर येथील शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय हे सर्वसामान्य नागरिकांसाठी 24 तास खुले असते.
विभागातील नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवली असून गरीब रुग्णांचे मोठ्या शस्त्रक्रिया देखील आम्ही मोफत केलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रभागातील नागरिकांसाठी माझी रुग्णवाहिका ही 24 तास उपलब्ध असते. तसेच अंतिम कार्यासाठी लागणारा मोक्षरथ देखील आम्ही प्रभागातील नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आम्ही केलेले कार्य हे जन माणसांचे हृदयामध्ये कोरलेला असून ते कधीही पुसता येणार नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये वरळी विभागातील सर्वसामान्य जनता शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील आणि शिवसेना भाजपा महायुतीच्या उमेदवाराला विजयी करतील असा मला ठाम विश्वास असल्याची माहिती शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी दिली.