तब्बल १२४ कोटींची मालमत्ता, हे आहेत बीएमसी निवडुकीतील सर्वांत श्रीमंत उमेदवार

 तब्बल १२४ कोटींची मालमत्ता, हे आहेत बीएमसी निवडुकीतील सर्वांत श्रीमंत उमेदवार

मुंबई, दि. १० : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे धाकटे बंधू मकरंद नार्वेकर यांनी येत्या बीएमसी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात तब्बल १२४.४ कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. प्रभाग क्रमांक २२६ मधून भाजप उमेदवार म्हणून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.
२०१२ मध्ये अपक्ष म्हणून पहिली निवडणूक लढवली तेव्हा मालमत्ता ₹३.६७ कोटी होती. २०१७ मध्ये मालमत्ता ₹६.३ कोटी होती. आता ती जवळजवळ २० पट वाढून ₹१२४.४ कोटी झाली आहे. या आकडेवारीमुळे मकरंद नार्वेकर हे बीएमसी निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवारांपैकी एक ठरले असून स्थानिक राजकारणात याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.

संपत्तीचे तपशील :

जंगम मालमत्ता – ₹३२.१४ कोटी

अचल मालमत्ता – ₹९२.३२ कोटी

बँक ठेवी – ₹६.६६ लाख

वाहने – ३ (२ टोयोटा फॉर्च्युनर, १ मारुती ग्रँड विटारा)

देणी – ₹३०.११ कोटी

स्थावर मालमत्ता :

दक्षिण मुंबईतील कुलाबा येथे ₹७.९९ कोटींचा फ्लॅट

रायगड जिल्ह्यातील अलिबाग परिसरात २७ शेतजमिनी (एकूण मूल्यांकन ₹८९.९१ कोटी)

पत्नी रचना नार्वेकर यांच्या नावावर २.४१ कोटींची जमीन

SL/ML/SL

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *