इराणमध्ये धार्मिक नेतृत्वा विरोधात तीव्र आंदोलन
तेहरान, दि. १० : गेल्या दोन आठवड्यांपासून इराणमध्ये धार्मिक नेतृत्वाविरोधात तीव्र आंदोलन सुरू आहे. वाढत्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर सरकारने संपूर्ण देशात इंटरनेट सेवा बंद केली आहे. सुरुवातीला महागाई, बेरोजगारी आणि चलनातील घसरण याविरोधात सुरू झालेले हे आंदोलन नंतर थेट सत्ता आणि धार्मिक नेतृत्वाविरोधात बदलले आहे.
देशातील 20 प्रांतांमध्ये बंड पसरले असून, 110 हून अधिक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली जात आहेत. रुग्णालयांमध्येही तोडफोडीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तेहरानमध्ये 26 बँकांमध्ये लूटमारही करण्यात आली आहे. 25 मशिदींना आग लावण्यात आली असून, 10 सरकारी इमारती जळून खाक झाल्या आहेत.
आतापर्यंत देशातील 5 लाखांहून अधिक लोक सहभागी झाले आहेत. देशाच्या विविध भागांमध्ये सुमारे 400 ठिकाणी ही निदर्शने होत आहेत. निदर्शनांदरम्यान झालेल्या झटापटीत एकट्या तेहरानमध्ये आतापर्यंत 217 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच 14 लष्करी जवानही मारले गेले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 2300 जणांना ताब्यात घेतले आहे.
SL/ML/SL