अयोध्येतील राम मंदिर परिसरात नमाज पठणाचा प्रयत्न, एकाला अटक

 अयोध्येतील राम मंदिर परिसरात नमाज पठणाचा प्रयत्न, एकाला अटक

अयोध्या, दि. 10 : अयोध्येतील राम मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेला चकवा आज एका वृद्धानं नमाज पठण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. नमाज पठण करण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडलं. पकडण्यात आलेल्या वृद्धाचं नाव अब्दुल अहद शेख आहे. प्राथमिक माहितीनुसार, अब्दुल शेख जम्मू-काश्मीरच्या शोपिया जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याचं वय ५५ वर्षांच्या आसपास आहे. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अब्दुल शेख सीता स्वयंपाकघराजवळ नमाज पठण करण्याचा प्रयत्न करत होता.

या संपूर्ण प्रकरणावर अयोध्या जिल्हा प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा अधिकृत विधान जारी केलेले नाही. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बाब अत्यंत संवेदनशील असल्याने सर्व बाबींची पडताळणी केल्याशिवाय अधिकृत माहिती दिली जाणार नाही. दक्षिण परकोटाच्या ज्या भागात ही घटना घडली, त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहेत जेणेकरून या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होऊ शकेल.

राम मंदिरात प्रवेश करताना फक्त सुरक्षा तपासणी केली जाते. आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्रे तपासली जात नाहीत. याचा फायदा घेत तिघे पुरुष राम मंदिर संकुलात घुसले. त्यानंतर ते मुख्य मंदिरापासून फक्त २०० मीटर अंतरावर असलेल्या सीता रसोई येथे पोहोचले, जिथे एकाने नमाज पठण करण्याचा प्रयत्न केला.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *