बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे शिवमंदीर तीन महिने राहणार बंद
पुणे, दि. ९ : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आजपासून पुढील तीन महिन्यांसाठी भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. स्थानिक नागरिक, विकासकामांशी संबंधित कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या विकास आराखड्यानुसार भीमाशंकर येथे विविध पायाभूत सुविधा, रस्ते, दर्शन व्यवस्था तसेच पर्यावरणपूरक विकासकामे सुरू असून, या कामांवर भाविकांच्या मोठ्या गर्दीचा परिणाम होऊ नये यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या कालावधीत भीमाशंकरकडे जाणारे सर्व प्रमुख रस्ते आणि पायवाटा पर्यटक व भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.
SL/ML/SL