पर्यावरण तज्ञ डॉ माधवराव गाडगीळ यांचे निधन…
पुणे दि ८ : ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांचं बुधवारी दि ७ जानेवारी रोजी रात्री प्रदीर्घ आजारपणामुळे पुण्यात निधन झालं, ते ८३ वर्षांचे होते. माधव गाडगीळ यांचे पुत्र सिद्धार्थ गाडगीळ यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. पुण्यातल्या डॉ. शिरीष प्रयाग यांच्या रूग्णालया त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार चालू होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं.
भारतातील पर्यावरणविषयक जाणिवा आणि विशेषतः पश्चिम घाटांमधील जैवविविधतेबाबतच्या
संवेदना जिवंत ठेवणं आणि त्या प्रगल्भ करणं यासाठी डॉ. माधव गाडगीळ यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. पश्चिम घाटांमध्ये राबवल्या जाणाऱ्या विकासकामांमुळे घाटातील जीवसृष्टी आणि एकूण पर्यावरणीय समतोलासाठी मोठं संकट निर्माण होऊ शकतं, हा धोक्याचा इशारा सर्वप्रथम माधव गाडगीळ यांनीच प्रशासनाला दिला. पश्चिम घाटाच्या संरक्षण व संवर्धनासाठी डॉ. माधव गाडगीळ यांनी तयार केलेला गाडगीळ अहवाल म्हणजे विकासकामांसाठी पर्यावरणाला धक्का पोहोचवण्यासाठी कायम तयार असलेल्या मानसिकतेला ढळढळीत वास्तव दाखवणारा आरसा ठरला.ML/ML/MS