एजिस लॉजिस्टिक कंपनीतील कामगारांना भरघोस पगारवाढ

 एजिस लॉजिस्टिक कंपनीतील कामगारांना भरघोस पगारवाढ

मुंबई, दि. ७ :
कामगार चळवळीसमोर मिळालेले रोजगार टिकवणे अशी अनेक आव्हाने असतांनाही मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने माहुल येथील एजिस लॉजिस्टिक लिमिटेड कंपनीतील कामगारांना १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२६ असा तीन वर्षांसाठी भरघोस पगारवाढीचा करार केला आहे. या करारामुळे कामगारांना कमीत कमी ६१६८ रुपये तर जास्तीत जास्त ८६०० रुपये पगारवाढ मिळणार आहे.

या करारामुळे कामगारांना २२.५ दिवसांची ग्रॅच्युइटी, सेवानिवृत्त कामगारांना एक अतिरिक्त वार्षिक पगारवाढ तसेच तीन वर्षांची थकबाकीही मिळणार आहे. जानेवारी २०२४ पासून पाच कामगारांना बढती मिळणार असून, या करारात सुपरवायझर, चार्जमेन्, फोरमन या कॅटेगरीतील कामगारांसाठी नवीन वेतनश्रेणी निर्माण केली आहे. वेतन करारावर ज्येष्ठ कामगार नेते व युनियनचे अध्यक्ष ॲड. एस. के, शेट्ये, सेक्रेटरी विद्याधर राणे, खजिनदार विकास नलावडे, कामगार प्रतिनिधी म्हणून जयेश तावडे , डी. एल. बोऱ्हाडे, व्यवस्थापनाच्या वतीने एन.एच.जे. राव, वरिष्ठ उपाध्यक्ष, गिरीश गुरखे, उपाध्यक्ष (एच. आर.), राजेश पाटील उपाध्यक्ष (ऑपरेशन), प्रवीण जांगडे, जनरल मॅनेजर ( एच.आर.) यांनी सह्या केल्या आहेत. याप्रसंगी एम. एच. साखरे, डी. जे. पालांडे इत्यादी कामगार कार्यकर्ते उपस्थित होते.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *