राजतपस्वी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी चरित्रग्रंथ प्रकाशित
मुंबई दि ४ : माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंतीच्या निमित्ताने राजतपस्वी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी या डॉ. लक्ष्मण शिवणेकर यांनी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेल्या मराठी भाषेत लिहिलेल्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते मुंबईत संपन्न झाले.

याप्रसंगी प्रकाशक विवेक मेहत्रे, लेखक डॉ. लक्ष्मण शिवणेकर , सौ वसुंधरा शिवणेकर (राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित) व डोंबिवलीकर मासिकाचे कार्यकारी संपादक प्रभू कापसे हे उपस्थित होते. प्रकाशनानंतर या चरित्र ग्रंथास वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
हा ग्रंथ सर्व प्रमुख ग्रंथ विक्रेते तसेच online amazon , Bookganga, udvelibooks , Gpay to 9869148418 वर उपलब्ध आहे. सातारा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बुक स्टॉलला भेट देऊन तुमची प्रत मिळवू शकता.ML/ML/MS