शिवसेनेने प्रसिद्ध केले मुंबई मॉडेलचे ‘पॉकेट बुक’

 शिवसेनेने प्रसिद्ध केले मुंबई मॉडेलचे ‘पॉकेट बुक’

मुंबई, दि. ३० : शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या ‘सॅफ्रॉन ॲण्ड ब्लॅक मुंबई’ या ‘पॉकेट बुक’मधून ठाकरी तेजपर्व अन‌् काळ्या गद्दारयुगाची तुलना’ करण्यात आली आहे. ही पुस्तिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतींना सविनय अर्पण करण्यात आली आहेत. या पुस्तिकेत मुंबई महापालिकेचे काटेकोर अर्थनियोजन, जगातील सर्वाधिक स्वस्त व बेस्ट बससेवा, मुंबई पब्लिक स्कूलचा यशस्वी प्रयोग, जगातील सर्वाधिक स्वस्त व मस्त आरोग्यसेवा, पिण्याचे शुद्धपाणी अत्यल्प दरात उपलब्ध करणारी मुंबई महापालिका, जगाने दखल घेतलेले मुंबईचे कोविड व्यवस्थापन, निसर्गस्नेही उद्यान, प्रशस्त मैदान व सुसज्ज नाट्यगृह, घनकचरा, सांडपाणी व आपत्ती व्यवस्थापन आणि २०२२ पासून मुंबईने अनुभवले गद्दारांचे अंधारयुग याविषयांना वाहिलेली आहे.

गेल्या २५ वर्षांत आम्ही आपली मुंबई आपुलकीने घडवली, प्रेमाने जपली असल्याने कितीही वादळवारे आली तरी मुंबईकर कोणत्याही अपप्रचाराला बळी पडणार नाही, असा विश्वास शिवसेनेच्या ‘पॉकेट बुक’मधून जागविण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांचे मुंबई मॉडेल यशस्वी कसे झाले? याच प्रश्नाचे उत्तर या पॉकेट बुकमधून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *