बस शिरली रांगेत उभ्या लोकांमध्ये! सहा ठार, २५ जखमी
मुंबई दि २९ : मुंबईत
भांडुप रेल्वे स्टेशनच्या बाहेर मिनी बसचा छोटा थांबा आहे. भांडुपच्या काही आतल्या भागात या बसेस प्रवश्याना घेऊन जातात. आज रात्री 9.30 च्या सुमारास एक मिनी बसचं नियंत्रण सुटून जवळ रांगेत उभ्या असलेल्या प्रवश्यांच्या अंगावर गेली. या अपघातात जवळ जवळ 25 जण गंभीर जखमी झाले. आणि 6 प्रवाशी मरण पावले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, याबाबतची अधिक सविस्तर माहिती अपेक्षित आहे.
ML/ML/MS