चांदीची ऐतिहासीक झेप – अडीच लाखांचा टप्पा पार
मुंबई, दि. २९ : चांदीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सर्व विक्रम मोडले. स्थानिक बाजारात पहिल्यांदाच २.५० लाख रुपये आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ८० डाॅलरचा टप्पा ओलांडला. सोमवारी,मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर पहिल्यांदाच चादीने प्रति किलोग्रॅम २,५०,००० रुपयांची पातळी ओलांडली. चांदीच्या किमतीतील या अचानक वाढीने बाजार भांडवलाच्या बाबतीत जगातील सर्वात मोठ्या टेक दिग्गज कंपनी Nvidia लाही मागे टाकले आहे.
सोमवारी, मार्च एक्सपायरी साठी Silver Price प्रति किलोग्रॅम २,५४,१७४ या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. मात्र त्यानंतर नफा बुकिंग सुरू झाली आणि किमती २,५१,७४६ रुपयांपर्यंत घसरल्या. या वर्षी चांदीने इतर सर्व चलनांना मागे टाकले आहे. चांदीने १८१ टक्के विक्रमी परतावा दिला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची १५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे तर पहिल्यांदाच ७५ डॉलर प्रति औंसच्या स्तराच्या पार गेली आहे. म्हणजे एक किलो चांदीची किंमत अडीच लाखांहून अधिक झाली आहे. तज्ज्ञांच्या मते चांदीची ही वाढ भीतीने नाही तर खऱ्याखुऱ्या मागणी आणि अपुरा पुरवठा यामुळे निर्माण झाली आहे.