‘धुरंधर – २ या दिवशी होणार रिलिज

 ‘धुरंधर – २ या दिवशी होणार रिलिज

मुंबई, दि. २९ : धुरंधर हा 2025 मध्ये सर्वांधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अक्षय खन्ना आणि रणवीर सिंह यांच्या भूमिकांमुळे चर्चेत आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड तोडले आहेत.सलग २४ आठवडे हा चित्रपट जोरदार सुरू आहे. धुरंधर पार्ट 2’साठीही प्रेक्षक आतापासूनच उत्सुक आहेत. ओटीटीवर हा सिनेमा 30 जानेवारी 2026 रोजी रीलिज होईल अशी शक्यता आहे.

निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘धुरंधर २’ हा १९ मार्च २०२६ रोजी ईदच्या मुहूर्तावर मोठ्या पडद्यावर धडकणार आहे. विशेष म्हणजे, पहिला भाग फक्त हिंदीत असताना, दुसरा भाग हिंदीसह तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा एकूण ५ भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित केला जाणार आहे.

‘जिओ स्टुडिओज’ आणि ‘बी ६२ स्टुडिओज’ यांची निर्मिती असलेला हा चित्रपट पहिल्या भागापेक्षा अधिक भव्य आणि अ‍ॅक्शनने परिपूर्ण असणार आहे. सध्या या चित्रपटाच्या पोस्ट-प्रॉडक्शचे काम वेगाने सुरू आहे. हा चित्रपट केवळ भारतातच नाही, तर परदेशातील बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित करण्याची योजना आखली जात आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *