स्व. रतन टाटाजी
जयंतीनिमित्त झाला सामाजिक उपक्रमांचा प्रेरणादायी कार्यक्रम
मुंबई, दि २९:
इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट यांच्या वतीने पद्मभूषण स्व. रतन टाटाजी यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमांचा प्रेरणादायी कार्यक्रम एनएबी पुनर्वसन विभाग, आनंद निकेतन, किंग जॉर्ज इन्फर्मरी, डॉ. ई. मोझेस रोड, मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन के. रवि (सीईओ) इंडिया मीडिया लिंक ऐंड इवेंट्स मैनेजमेंट यांनी केले.
याप्रसंगी के. रवि यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “स्व. रतन टाटा साहेबांची जयंती ही केवळ स्मरणदिन न राहता शासनाच्या वतीने सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरी व्हावी. देशाच्या औद्योगिक व सामाजिक प्रगतीत रतन टाटा यांचे योगदान अतुलनीय आहे.”
तसेच “ रतन टाटा जयंतीनिमित् दुबई मधील बुर्ज खलिफा येथे बॅनर प्रसारित करण्यासाठी निवेदन दिले असून त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. याशिवाय 28 जानेवारी 2026 रोजी समुद्रातील बोटीमध्ये रक्तदान शिबिर व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
रतन टाटा यांना अभिवादन म्हणून त्यांनी के . रवि ( दादा ) ह्यांनी एक अनोखी संकल्पना ही. मांडली “ रतन टाटा जयंतीच्या दिवशी शहरातील प्रत्येक कुटुंबाने आपल्या सोयीनुसा किमान एक तास लाईट बंद ठेवावी.
आजही अध्यक्षा देशाच्या अनेक गावांमध्ये व वस्त्यांमध्ये पुरेशी वीज पोहोचलेली नाही. शुरुआती
पासूनच वीज निर्मितीत टाटांचा मोठा सहभाग असल्याने वाचवलेली वीज इतरांच्या उपयोगी यावी, हीच खरी श्रद्धांजली ठरेल,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी आलोककुमार कासलीवाल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “नेत्रहीन व्यक्तींना ‘नेत्रदीपक’ बनवण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये मोठी शारीरिक क्षमता असते. योग, प्राणायाम, व्यायाम व संतुलित आहाराच्या माध्यमातून ती क्षमता सक्रिय ठेवणे गरजेचे आहे. विनाकारण हॉस्पिटल खर्च करण्यापेक्षा योग्य नियोजन केल्यास आपण शारीरिकदृष्ट्या सक्षम राहू शकतो.” तसेच या प्रशिक्षण प्रकल्पासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
या प्रसंगी अंध प्रशिक्षणार्थींच्या कला-कौशल्य प्रशिक्षणासाठी भाग्यश्री वर्तक (वर्तक ताई) यांनी ₹10,000 रुपयांचा निधी देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली.
कार्यक्रमाच्या वेळी स्व. रतन टाटा यांच्या सेल्फी प्रतिमेस सप्तरंगी फुलांनसहित आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक जाणीव, प्रेरणादायी विचार आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
या कार्यक्रमास आलोककुमार कासलीवाल (एस कुमार ग्रुप), रविंद्र जैन, प्रीतम आठवले, भाग्यश्री वर्तक, अभिनेता. बॉबी वत्स, एडवोकेट . अशोक यादव, हमीद खान, सीता वेणी, रमाकांत मुंडे, जयश्री ठाकूर, दिनेश परेशा, यशवंत भंडारे, पल्लवी कदम, रॉकी फर्नांडिस, प्रकाश दुपारगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना पत्रकार . सुरेश यादव यांनी प्रभावीपणे सादर केली.KK/ML/MS