गणपती बाप्पांना सांताक्लॉजच्या रूपात दाखवल्याने वाद
मुंबई, दि. २६ : नाताळ सणानिमित्त भाजपने दिलेल्या एका जाहिरातीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पांना सांताक्लॉजच्या रूपात दाखवल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे, यावरून काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. निवडणुकांसाठी हिंदुत्वाचा अजेंडा राबवणाऱ्या भाजपने हिंदूंच्या धार्मिक भावनांशी केलेला हा खेळ अत्यंत निषेधार्ह असल्याचे सांगत, पाटील यांनी या कृतीचा तीव्र शब्दांत समाचार घेतला.
सतेज पाटील यांनी ट्विट करत म्हटले की, हिंदू संस्कृतीचे स्वयंघोषित रक्षक असल्याचा आव दाखवणाऱ्या भाजप सरकारचा दुटप्पीपणा पहा. सांस्कृतिक मंत्रालयाच्या जाहिरातीत महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती बाप्पांना थेट सांताक्लॉजच्या रूपात दाखवले आहे. हा प्रकार हिंदू संस्कृतीचा आणि श्रद्धेचा अपमान नाही का? सरकारचा पीआर करण्यासाठी दैवतांचे रूप बदलणे, हेच का स्वयंघोषित संस्कृती रक्षकांचे कर्तव्य? श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक अस्मिता यांचा बाजार मांडून पीआर करण्याची ही वृत्ती आजची नाही. निवडणुकांसाठी “हिंदुत्व” जपणाऱ्या भाजप सरकारने हिंदू भावनांशी केलेला खेळ निषेधार्ह आहे.
मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी देखील भाजपच्या या जाहिरातीवर टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, गणपती बाप्पाला सांताक्लॉजच्या वेशात दाखवलेली केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने दिलेली ही जाहिरात पाहून तीव्र संताप होत आहे. काल दिवसभर भाजपचे लोक विविध ठिकाणी ख्रिसमस साजरा करणाऱ्या लोकांना मारहाण करत होते. तर दुसरीकडे मोदी स्वतः चर्च मध्ये जाऊन ख्रिसमस साजरा करत होते