चार चाकी शिकण्यासाठी सरकार देणार ५ हजार रु भत्ता
मुंबई, दि. 24 : महाराष्ट्र कामगार कल्याण अधिनियम १९५३ अंतर्गत मंडळाकडे नोंदीत झालेला कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांसाठी वाहन चालक प्रशिक्षण आर्थिक सहाय्यता योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि नियम असणार आहेत.
योजनेंतर्गत ज्या कामगारांनी आणि कामगार कुटुंबीय सदस्यांनी शासनमान्य वाहन चालक प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण पूर्ण करून कायम परवाना मिळविलेला असेल अशा कामगारास आणि कामगार कुटुंबीय सदस्यास कमाल रु.५०००/- पर्यंतची आर्थिक मदत लाभ म्हणून देण्याची मंडळाची ही योजना आहे. अधिक माहितीसाठी www.public.mlwb.in या संकेतस्थळाला भेट द्या.
अर्ज सादर करताना कामगार व त्यांच्या कुटुंबियांना ओळखीचा पुरावा म्हणुन आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदार कार्ड/पासपोर्ट व वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला/जन्म दाखला यापैकी एक व प्रशिक्षणार्थी कामगार कुटुंबीय असल्यस पुराव्याकरीता कुटुंबाचे रेशनकार्ड जोडणे बंधनकारक राहील.
सदर योजनेकरीता शैक्षणिक पात्रता, वय व शारीरिक सक्षमता मोटर वाहन विभागाने वेळोवेळी निश्चित केलेल्या नियम व अटीनुसार राहील.