पाकिस्तानी एअरलाइन्सची ४८२ दशलक्ष डॉलरमध्ये विक्री

 पाकिस्तानी एअरलाइन्सची ४८२ दशलक्ष डॉलरमध्ये विक्री

इस्लामाबाद, दि. २४ : आर्थिक संघर्षाने ग्रासलेल्या पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे खाजगीकरण (Privatization) प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. इस्लामाबाद येथे झालेल्या थेट लिलावात अरिफ हबीब यांच्या नेतृत्वाखालील कन्सॉर्शियमने 75% हिस्सा विकत घेतला. या व्यवहाराची किंमत 135 अब्ज रुपये (482-485 दशलक्ष डॉलर्स) म्हणजेच सुमारे 135 अब्ज पाकिस्तानी इतकी ठरली. हा सौदा पाकिस्तानच्या आर्थिक सुधारणांसाठी ऐतिहासिक मानला जात आहे.

या एअरलाइन्सकडे ३२ विमाने (aircraft) असून त्यात एअरबस (Airbus)ए३२०, बोईंग (Boeing)७३७, एअरबस ए३३० आणि बोईंग ७७७ सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे. पाकिस्तान सरकारवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा दबाव आहे. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून अंदाजे ७ अब् डॅालरच्या बेलआउट पॅकेजची आवश्यकता आहे आणि त्या बदल्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तोट्यात असलेल्या सरकारी कंपन्यांना खाजगी हाती सोपवू इच्छित आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *