मुंबई-ठाण्यात Third Eye Asian Film Festival

 मुंबई-ठाण्यात Third Eye Asian Film Festival

मुंबई, दि. २४ : ’22 व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवा’चं आयोजन करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो आहे. “गेली बावीस वर्ष या महोत्सवाने आशियाई आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कलाकृती महाराष्ट्रातील रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलं आहे. यंदा माझे वडील डॉ. व्ही. शांताराम यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या अजरामर कलाकृतींचे चित्रपट दाखवणं हा आमच्यासाठी विशेष आनंदाचा क्षण आहे, असं आशियाई चित्रपट फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम म्हणाले…”

’22 वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ दिनांक 9 जानेवारी ते 15 जानेवारी 2026 या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात आशियाई तसेच भारतीय चित्रपटांचा समावेश असून, यंदा एकूण 56 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. महोत्सवात निवडलेले हे 56 चित्रपट प्रभादेवीतील पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतील मिनी थिएटर आणि ठाण्यातील लेक शोर मॉलमधील सिनेपोलीस चित्रपटगृहात दाखवले जाणार आहेत. बूसान चित्रपट महोत्सवात FIPRESCI ज्युरी पुरस्कार पटकावलेल्या ‘ऑन यूअर लॅप’ या इंडोनेशियन चित्रपटाच्या प्रदर्शनानं महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे.

मराठी चित्रपट स्पर्धा विभागात अकरा मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत. एप्रिल मे 99, सांगळा, गमन, गिराण, गोंधळ, किमिडीन, निर्जळी, प्रिझम, साबर बोंड, सोहळा, उत्तर या सिनेमांचा या विभागात समावेश आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *