सोलापुरातील महाविद्यालयात रॅगिंग, विद्यार्थ्यांला मारहाण
सोलापुरातील बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील एका महाविद्यालयात धक्कादायक घटना घडली आहे. रॅगिंग सदृश घटना घडल्याने सोलापूर जिल्हा हादरला आहे. अकरावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याला चार विद्यार्थ्यांनी खोलीत घुसून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.महाविद्यालय प्रशासनाने याबाबत त्यांची अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. या मारहाणीत जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव प्रसिक बनसोडे असे असून, त्याच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. रुम स्वच्छ करण्यात नकार दिल्याने या विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पीडित विद्यार्थी प्रसिक बनसोडे याने माहिती देताना सांगितले की, याआधीही महाविद्यालयात असे प्रकार घडले आहेत. महाविद्यालय प्रशासन संबंधित विद्यार्थ्यांना पाठीशी घालत आहे, असा गंभीर आरोपही प्रसिक बनसोडे याने केला आहे.