हा ठरला२०२५ मधील सर्वांधिक कमाई करणारा चित्रपट
मुंबई, दि. २३ : रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने मोठे विक्रम मोडत आहे. प्रदर्शनाच्या 18व्या दिवशी चित्रपटाचे एकूण वर्ल्डवाइड कलेक्शन 877 कोटी झाले आहे. यासोबतच ‘धुरंधर’ या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. आतापर्यंत हा विक्रम ऋषभ शेट्टीच्या कन्नड चित्रपट ‘कांतारा: द लीजेंड-चॅप्टर 1’ कडे होता, ज्याचे एकूण कलेक्शन 850 कोटी रुपये आहे. मात्र, भारतीय सिनेमाच्या इतिहासात कमाईच्या बाबतीत हा चित्रपट 11व्या क्रमांकावर आहे.
चित्रपटाचे वर्ल्डवाइड कलेक्शन 877 कोटी आहे, तर चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 598 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाने सोमवारी उत्कृष्ट कामगिरी करत 19.70 कोटींचे कलेक्शन केले आहे. तर दुसऱ्या रविवारी चित्रपटाने 40 कोटी कमावले होते.
दुसऱ्या वीकेंडच्या कमाईच्या बाबतीत, धुरंधरने रणबीर कपूरच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ॲनिमलचा विक्रमही मोडला आहे. ॲनिमल चित्रपटाने रिलीजच्या १७व्या दिवशी (रविवारी) १४.५ कोटी कमावले होते, तर धुरंधरने ३८.५ कोटी कमावले आहेत. ॲनिमलच्या दुसऱ्या वीकेंडच्या कलेक्शनपेक्षा धुरंधरचे सोमवारचे कलेक्शन (१९.७० कोटी) देखील जास्त आहे.