कोल्हापुर-मुंबई बसवर 1 कोटी 22 लाखांचा दरोडा
मुंबई, दि. 23 : कोल्हापुर मुंबई बसवर 1 कोटी २२ लाख रुपयांचा दरोडा पडला आहे. 60 KG चांदी दरोडेखोरांनी लुटली आहे. दरोडेखोर बसमध्ये घुसले आणि चाकूचा धका दाखवून त्यांनी हा दरोडा टाकला. कोल्हापूर ते मुंबईला जाणाऱ्या अशोका कंपनीच्या खाजगी आराम बसवर दरोडा पडला आहे. किणी गावचे हद्दीत अनोळखी सात ते आठ अनोळखी इसमाने चाकूचा धाक दाखवून सुमारे 1 कोटी 22 लाख रुपयेचा धाडसी दरोडा टाकला. कोल्हापुरातून मुंबईकडे जाणारी अशोका कंपनीची खाजगी आराम बस रात्री अकराच्या दरम्यान कोल्हापुरातून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली. तावडे हॉटेल या ठिकाणी तीन अनोळखी व्यक्ती बसमध्ये बसल्या. ही बस पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किनी गावच्या हद्दीत आली असता बस मधील तिघांनी चाकूचा धाक दाखवून बस रस्त्याकडेला थांबवली. त्यानंतर बसच्या पाठीमागून येणाऱ्या चार ते पाच अनोळखी व्यक्ती बसमध्ये घुसले.
बस मध्ये असणाऱ्या 34 किलो वजनाची चांदी, प्लॅस्टिक पोत्यातील 26 किलो वजनाची चांदी, मशिनरीचे स्पेअर पार्ट आणि दहा ग्रॅम सोन्याचे दागिने, आणि एक मोबाईल हँडसेट असा सुमारे असा सुमारे 1 कोटी 22 लाख 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन पसार झाले. पसार होताना संशयित दरोडेखोरानी बस चालक आणि प्रवाशांना या हद्दीत थांबायचं नाही, नाहीतर जिवानिशी मारू अशी धमकी दिल्याने बस पुढे निघून गेली आणि चालकाने सांगली जिल्ह्यातील कणेगाव इथं थांबून सांगली पोलीसाकडे धाव घेतली. यानंतर सर्व प्रवाशांना घेऊन बस पेठवडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आली.