फायनान्स इफ्लूएन्सर अवधूत साठेंना सॅटकडून दिलासा
मुंबई, दि. १९ : सिक्युरिटीज अपीलेट ट्रिब्युनल (SAT) ने फायनान्स इफ्लूएन्सर अवधूत साठे आणि त्यांच्या अकॅडमीला (ASTA) दिलासा दिला आहे. ट्रिब्युनलने अकॅडमीला त्यांच्या बँक खात्यातून दरमहा २.२५ कोटी रुपये काढण्याची परवानगी दिली आहे.
हा निर्णय मार्केट रेग्युलेटर SEBI च्या त्या अंतरिम आदेशाविरुद्ध दाखल केलेल्या अपीलवर आला आहे, ज्यात साठेंचे ५४६ कोटी रुपये जप्त करण्याचे आणि त्यांना शेअर बाजारातून प्रतिबंधित करण्याचे निर्देश दिले होते. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जानेवारी २०२६ रोजी होईल.
SEBI ने ४ डिसेंबर रोजी एक अंतरिम आदेश जारी केला होता. यात आरोप करण्यात आला होता की, अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी ‘शिक्षण’ आणि ‘प्रशिक्षण’ या नावाखाली नोंदणीशिवाय इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझरी आणि रिसर्च ॲनालिस्टच्या सेवा देत होती. सेबीने अकॅडमीला बाजारातून बाहेर काढण्यासोबतच बेकायदेशीरपणे कमावलेले ५४६ कोटी रुपये जप्त करण्याचा आदेश दिला होता. साठे यांनी या आदेशाला ‘आर्थिक मृत्यू’ असे संबोधत सिक्युरिटीज अपीलेट ट्रिब्युनलमध्ये आव्हान दिले होते.
अवधूत साठे यांच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला की, सेबीच्या आदेशामुळे त्यांची सर्व खाती गोठवण्यात आली आहेत, ज्यामुळे व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे. अकॅडमीने कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर खर्चांसाठी दरमहा 5.25 कोटी रुपये काढण्याची परवानगी मागितली होती.
मात्र, SEBI ने याला विरोध करत म्हटले की, यापैकी सुमारे 3 कोटी रुपये केवळ जाहिरात आणि सेमिनारसाठी आहेत, जे सध्या आवश्यक नाहीत. सुनावणीनंतर न्यायमूर्ती पी.एस. दिनेश कुमार यांनी 2.25 कोटी रुपये काढण्याची परवानगी दिली आहे.
अवधूत साठे आहेत कोण?
अवधूत साठे हे फिनइन्फ्लुएंसर म्हणून ओळखले जातात आणि ते Avadhut Sathe Trading Academy Pvt. Ltd. (ASTAPL) या संस्थेचे प्रमुख आहेत. अलीकडेच भारतीय प्रतिभूति आणि विनिमय बोर्ड (SEBI) ने त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. SEBI च्या आदेशानुसार अवधूत साठे आणि त्यांच्या अकॅडमीला 546.2 कोटी रुपये परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांच्यावर 3.4 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांना गुमराह करून बिननोंदणी गुंतवणूक सल्लागार व रिसर्च अॅनालिस्ट सेवा दिल्याचा आरोप आहे. या कारवाईनंतर त्यांना सिक्युरिटीज मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारची क्रियाकलाप करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अवधूत साठे हे सध्या चर्चेत असून, गुंतवणूकदारांना चुकीची माहिती देऊन आर्थिक फायदा मिळविल्याचा आरोप त्यांच्यावर सिद्ध झाला आहे.
SL/ML/SL