राज्यातील 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी उद्या मतदान

 राज्यातील 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी उद्या मतदान

मुंबई, दि.१९ : राज्यातील 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी; तसेच विविध नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींमधील 143 सदस्यपदांच्या जागांसाठी उद्या (ता. 20) मतदान होणार असून सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर केला होता. त्यानुसार 02 डिसेंबर 2025 रोजी 263 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले. उर्वरित ठिकाणी उद्या मतदान होणार आहे. सर्व संबंधित ठिकाणी 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *