श्रीधर बुधाजी देवलकर शिव आरोग्य सेनेतर्फे सन्मानित
मुंबई, दि. १६ : कामगार राज्य विमा योजना रुग्णालय, कांदिवली ( पूर्व) मुंबई येथील रुग्णालयातील रक्तपेढी विभाग तंत्रज्ञ तथा रक्तदान शिबिरांचा विक्रम करणारे श्रीधर बुधाजी देवलकर यांना नुकताच कथाकार, कवी आणि व्यंगचित्रकार हा सन्मान प्रदान करण्यात आला. हा छोटेखानी सन्मान सोहळा शिव आरोग्य सेना, शिवसेना भवन, दादर येथे आयोजित करण्यात आला होता. शिवसेना शिव आरोग्य सेनेचे सरचिटणीस जितेंद्र सकपाळ यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला.
राज्यस्तरीय छायांकित दिवाळी अंक २०२५ द्वारे पोस्टमन या विषयावर कथा आणि कविता सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते, त्याप्रमाणे देवलकर यांनी लिहिलेल्या कथा आणि कविता या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाल्या. कार्यक्रमास शिव आरोग्य सेनेचे पदाधिकारी सय्यद साठविलकर, अजित पाटील व अन्य प्रमुख मान्यवर उपस्थित होते.ML/ML/MS