हे आहे क्रिप्टो करन्सीमध्ये सर्वांधीक गुंतवणूक करणारे राज्य
मुंबई, दि. १५ : कॉइनस्विचच्या २०२५ च्या अहवालातून असे दिसून आले आहे की उत्तर प्रदेश आता क्रिप्टो गुंतवणुकीसाठी भारतातील सर्वात मोठे राज्य बनले आहे. उत्तर प्रदेशमध्ये एकूण cryptocurrency गुंतवणुकीच्या १३% गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्र (१२.१%) आणि कर्नाटक (७.९%) यांचा क्रमांक लागतो. अहवालानुसार, २०२५ मध्ये टियर २ शहरांमधील लोक कॉइनस्विचच्या एकूण वापरकर्त्यांपैकी ३२.२% होते. तर टियर ३ आणि टियर ४ शहरांचा वाटा ४३.४% होता.
२६ ते ३५ वयोगटातील लोक एकूण ४५% गुंतवणूक करत आहेत, जे गेल्या वर्षी ४२% होते. – १८ ते २५ वयोगटातील तरुण २५.३% गुंतवणूक करत आहेत, जे २०२४ च्या तुलनेत थोडीशी घट आहे. कॉइनस्विचच्या एकूण वापरकर्त्यांपैकी १२% महिला आहेत. परंतु हा आकडा राज्यांमध्ये लक्षणीयरीत्या बदलतो. आंध्र प्रदेशातील महिला क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीत आघाडीवर आहेत. येथील क्रिप्टो गुंतवणूकदारांपैकी ५९% महिला आहेत, जे पुरुषांपेक्षा १८% जास्त आहेत.
SL/ML/SL