भारताने पहिल्यांदाच जिंकला स्क्वॉश विश्वचषक

 भारताने पहिल्यांदाच जिंकला स्क्वॉश विश्वचषक

चेन्नई , दि. १५ : येथील एक्सप्रेस एव्हेन्यू मॉलमध्ये खेळल्या गेलेल्या स्क्वॉश वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत भारतीय मिश्र संघाने हॉंगकॉंगला 3-0 ने हरवून इतिहास रचला.
मिश्र सांघिक स्पर्धेत भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. यापूर्वी 2023 मध्ये भारताची सर्वोत्तम कामगिरी कांस्यपदक होती.

या स्पर्धेत 12 संघांनी शॉर्ट आणि फास्ट फॉरमॅटमध्ये भाग घेतला. भारताने उपांत्य फेरीत बलाढ्य मानल्या जाणाऱ्या इजिप्तच्या संघाला हरवून अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. अंतिम सामन्यात भारतीय खेळाडूंचे वर्चस्व सुरुवातीपासून शेवटपर्यंत कायम राहिले.

भारतीय संघाचे नेतृत्व अनुभवी खेळाडू जोशना चिनप्पाने केले. अंतिम फेरीतील पहिल्या सामन्यात जोशनाने हॉंगकॉंगच्या यी ली (वर्ल्ड नंबर-37) ला 3-1 ने हरवून भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अभय सिंगने ॲलेक्स लाऊला 3-0 ने पराभूत केले. निर्णायक सामन्यात 17 वर्षीय अनाहत सिंगने टोमॅटो हो ला 3-0 ने हरवून भारताचा ऐतिहासिक विजय निश्चित केला. भारतीय संघात जोशना चिनप्पा, अभय सिंह, वेलावन सेंथिलकुमार आणि अनाहत सिंह यांचा समावेश होता. सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक एक्सप्रेस अव्हेन्यू मॉलमध्ये उपस्थित होते.

पंतप्रधानांनी स्क्वॉश वर्ल्ड कप विजयाबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, एसडीएटी स्क्वॉश वर्ल्ड कप 2025 मध्ये पहिल्यांदाच विजेतेपद पटकावून भारतीय संघाने इतिहास रचला आहे. त्यांनी जोशना चिनप्पा, अभय सिंग, वेलावन सेंथिल कुमार आणि अनाहत सिंग यांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि दृढनिश्चयाचे कौतुक केले आणि सांगितले की हा विजय देशातील तरुणांमध्ये स्क्वॉशची लोकप्रियता वाढवेल.

सामन्यानंतर जोशना चिनप्पा म्हणाली, “स्पर्धेपूर्वी आम्हा सर्वांना विश्वास होता की आम्ही हे करू शकतो. सर्व खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये होते.” तिने घरच्या प्रेक्षकांच्या पाठिंब्यालाही विशेष म्हटले आणि सांगितले की तिने तिच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या आणि उत्साही प्रेक्षकांसमोर खेळले. स्क्वॅशचा 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच समावेश केला जात आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *