देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन
लातूर दि १२ : देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे लातूर येथे देवघर या त्यांच्या निवासस्थानी आज सकाळी दुःखद निधन झाले. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे ते 92 वर्षाचे होते. त्यांनी काँग्रेस राजवटीमध्ये भारताचे सभापती म्हणून काम पाहिले त्यांच्याच कालावधीमध्ये भारताच्या लोकसभेचे टीव्ही वरती प्रसारण सुरू झाले. त्यानंतर काँग्रेस राजवटीतच देशाचे गृहमंत्री राहिले, अंतिम टप्प्यात त्यांनी देशाचे महत्त्वपूर्ण राज्य असणाऱ्या पंजाब राज्याचे राज्यपाल म्हणून देखील काम पाहिले . त्यांच्यावरती लातूर येथील वरवंटी परिसरात असणाऱ्या त्यांच्या शेतामध्ये शासकीय इतमामत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा शैलेश, सून अर्चनाताई पाटील चाकूरकर, नातवंडे असा परिवार आहे.ML/ML/MS