नेरुळ ते मुंबई फक्त ३० मिनिटांत, १५ डिसेंबरपासून फेरीबोट सुरु
मुंबई, दि. ११ : नेरुळ ते भाऊचा धक्का प्रवासी फेरी सेवा १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. सेवेमुळे सध्या ९० मिनिटांचा रस्ते प्रवास केवळ ३० मिनिटांत पूर्ण होणार आहे. सिडकोने उभारलेल्या नेरुळ पॅसेंजर वॉटर टर्मिनल (NPWT) साठी ही सेवा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
सुरुवातीला दररोज चार ट्रिप्स आणि २० आसनी फेरी या मार्गावर धावेल. प्रति प्रवासी ₹९३५ इतके भाडे आकारले जाईल. मेरीटाईम बोर्डाकडून अंतिम परवानगी मिळताच सेवा अधिकृतरीत्या सुरू केली जाईल. ही मंजुरी वेळेवर मिळण्याची अपेक्षा असल्याचे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
फेरीचे ऑपरेटर ‘वॉटरफ्रंट एक्सपिरीयन्सेस मुंबई प्रा. लि.’ (द्रीष्टी ग्रुप) यांनी नेरुळ–मुंबई मार्गासाठी सुरक्षा अधिक कडक केली आहे. तसेच, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ऑपरेटरकडून विविध योजना तयार केल्या जात आहेत.
सर्व प्रवाशांनी चढताना लाईफ जॅकेट परिधान करणे बंधनकारक
जानेवारीपासून स्पीडबोट शो
लवकरच जेट-स्कीइंग
फ्लोटिंग रेस्टॉरंट
फ्लेमिंगो टुरिझम सर्किट
वॉटरस्पोर्ट्स, स्पीडबोट शो, जेट-स्की यांसारखे उपक्रम जानेवारीपासून
मुंबईहून येणाऱ्या पर्यटकांना नेरुळ जेटीवर ओरिएंटेशन देऊन डीपीएस लेक परिसरात फ्लेमिंगो निरीक्षणासाठीही नेले जाईल.
SL/ML/SL