नियोजन विभागाने रोखली मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी योजना…
नागपूर दि ११ : मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी ही योजना नियोजन विभागाने काढलेल्या तृटी आणि शेऱ्यांमुळे रखडल्याचे खुद्द मंत्र्याने मान्य केले , मात्र ती लवकरच सुरू करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात दिली. हा प्रश्न मुरजी पटेल यांनी उपस्थित केला होता त्यावर अमित साटम, नमिता मुंदडा, देवयानी फरांदे आदींनी उपप्रश्न विचारले.
या योजनेच्या अंमलबजावणी ला तब्बल सहा महिने विलंब झाला आहे, असा मुद्दा आधी अमित साटम आणि मग देवयानी फरांदे यांनी मांडला यावर भुसे संतप्त झाले , माझ्यामुळे ही योजना रखडली का असा प्रति सवाल केला, नियोजन विभागाने शेरे मारल्याने ती रखडली , त्यांनी काढलेल्या त्रुटींना काय खुलासे द्यायचे असा प्रश्नच आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांना यात मार्ग काढायला सांगितलं जाईल असं भुसे यांनी स्पष्ट केलं.
या योजने अंतर्गत तालुका वविज्ञान प्रदर्शनात प्राविण्य दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना विभागीय स्तरावरील विज्ञान केंद्रात , जिल्हा स्तरावरील विद्यार्थ्यांना इस्रो मध्ये आणि राज्य स्तरावर विद्यार्थ्यांना थेट नासा मध्ये नेण्याची ही योजना आहे अशी माहिती देखील मंत्री दादा भुसे यांनी यावेळी दिली.ML/ML/MS