हे आहेत 2025 मधील सुपरहिट OTT Show
मुंबई, दि. १० : मनोरंजनाच्या जगात 2025 हे वर्ष खास ठरले. अनेक लोकप्रिय मालिकांचे नवे सीझन तसेच काही ताज्या दमदार कथा प्रेक्षकांना OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळाल्या. IMDb ने या वर्षातील टॉप भारतीय वेब मालिकांची यादी जाहीर केली असून त्यात ॲक्शन, थ्रिलर, ड्रामा आणि कॉमेडी अशा विविध प्रकारांचा समावेश आहे.
टॉप 7 वेब मालिका (2025)
- क्रिमिनल जस्टिस: अ फॅमिली मॅटर (JioHotstar)
रोहन सिप्पी दिग्दर्शित ही मालिका न्यायव्यवस्थेतील गुंतागुंतीवर आधारित आहे. पंकज त्रिपाठी, मोहम्मद झीशान अय्यूब आणि सुरवीन चावला यांच्या दमदार अभिनयामुळे ही कथा प्रभावी ठरते. - पंचायत 4 (Prime Video)
ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित ही लोकप्रिय मालिका चौथ्या सीझनमध्ये परतली आहे. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता आणि रघुबीर यादव यांच्या अभिनयामुळे पुन्हा एकदा ही मालिका चर्चेत आली आहे. चित्रीकरण मध्यप्रदेशातील महोदिया गावात झाले आहे. - द हंट: द राजीव गांधी असॅसिनेशन केस (SonyLIV)
नागेश कुकनूर दिग्दर्शित ही क्राइम थ्रिलर मालिका राजीव गांधींच्या हत्येच्या तपासावर आधारित आहे. ही कथा अनिरुद्ध मित्रा यांच्या नाईंटी डेज या पुस्तकावरून प्रेरित आहे. - द फॅमिली मॅन 3 (Prime Video)
मनोज वाजपेयी यांच्या प्रमुख भूमिकेत आलेला हा सीझन पूर्वोत्तर भारताशी संबंधित भू-राजकीय विषयांवर प्रकाश टाकतो. चाहत्यांनी याची आतुरतेने वाट पाहिली होती. - द बार्ड्स ऑफ बॉलिवूड (Netflix)
आर्यन खान दिग्दर्शित ही मालिका बॉलिवूडच्या जगात एका बाहेरील व्यक्तीच्या संघर्षमय प्रवासाची कथा सांगते. बॉबी देओल, लक्ष्य लालवानी आणि मोना सिंग यांसारख्या कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत. - स्पेशल ऑप्स 2 (JioHotstar)
RAW एजंट हिम्मत सिंग (के के मेनन) पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार शोधण्यासाठी खास टीम तयार करतो. ॲक्शन आणि थ्रिलरने भरलेली ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवते. - बकैती (Bakaiti)
अमित गुप्ता दिग्दर्शित ही विनोदी-ड्रामा मालिका गाझियाबादमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फिरते. आर्थिक तणाव आणि कौटुंबिक संघर्ष यांची हलकी-फुलकी मांडणी यात केली आहे.