इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी आठ दिवसात लागू करण्याचे अध्यक्षांचे निर्देश
नागपूर दि १० : राज्यातील सर्व इलेक्ट्रिक वाहनांना शासनाने जाहीर केलेली टोल प्रणालीत आवश्यक सुधारणा करून टोल माफी येत्या आठ दिवसात लागू करण्याची कारवाई करण्यात यावी आणि निर्णय लागू केल्यापासून आजवर वसूल झालेली टोल रक्कम परत करावी असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत दिले,प्रशोत्तराच्या तासात संबंधित प्रश्नावर ते बोलत होते.
याबाबतचा प्रश्न शंकर जगताप यांनी उपस्थित केला होता,त्यावर वरुण सरदेसाई यांनी उपप्रश्न विचारले. शासनाने या वाहनांना टोल माफी जाहीर केली मग आता शब्द फिरवता येणार नाही, सर्व संबंधित टोल नाक्यांवर टोल न घेण्याच्या सूचना आठ दिवसात देण्यात याव्यात. अशा वाहनांसाठी राज्यभर चार्जिंग स्टेशन वाढवा आणि त्यांच्या क्षमतेत देखील वाढ करा अशा सूचना अध्यक्षांनी यावेळी दिल्या . याआधी यावर उत्तर देताना प्रभारी मंत्री दादा भुसे यांनी संबंधित प्रणाली लागू करण्यास तीन महिने उशीर झाल्याचे कबूल केलं होतं. मात्र लवकरच त्यात सुधारणा करू असं ते म्हणाले.
वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग दरम्यान होणाऱ्या नवीन रस्त्याची लांबी १८२ किलो मीटर वरून ती १०४ किमी इतकी कमी करण्याचं नियोजन करण्यात येत आहे , हा रस्ता ६५ गावातून जाईल अशी माहिती मंत्री भुसे यांनी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात दिली. हा प्रश्न अजय चौधरी यांनी उपस्थित केला होता, त्यावर मनिषा चौधरी, रईस शेख, योगेश सागर आदींनी उपप्रश्न विचारले.ML/ML/MS