जर्मन विद्यापिठाकडून अनंत गाडगीळ यांचा बहुमान
मुंबई दि ९ : जर्मनीतील प्रसिद्ध हायडेलबर्ग विद्यापीठाने यंदाच्या हिवाळी सत्रामधील ‘आंतरराष्ट्रीय वक्ता’ म्हणून कॅांग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंत गाडगीळ यांना आमंत्रित केले असून या आठवड्यामधे ‘ भारतीय राजकिय पद्धती व लोकशाही पुढची आवाहने” या विषयावर गाडगीळ यांचे जर्मनीत व्याख्यान सदर विद्यापिठातर्फे आयोजित करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी नोबेल नामांकित प्रा हार्ष मानदर, किल विद्यापीठाचे प्रा बर्मन कूल्क, तूर्कस्थानच्या सबान विद्यापीठाचे डॅा ब्रिक्स एसेन व अमेरीकेच्या पेन्सलवेनिया विद्यापिठाचे प्रा रुदार सिल अश्या नामांकित वक्त्यांना यंदाच्या वर्षात आमंत्रित करण्यात आले होते .ML/ML/MS