‘मुंबई ते गुवाहाटी व्हाया सूरत’ – शिंदेंच्या बंडावर येतंय पुस्तक
मुंबई, दि. ८ : सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साडे तीन वर्षांपूर्वी शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड केले होते. या बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं होतं. शिवसेनेच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या बंडावर ‘मुंबई ते गुवाहाटी व्हाया सूरत’ असं पुस्तक लिहिण्याचा आणि लेखक बनण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानस उदय सामंत यांनी बोलून दाखवला. ठाण्यातील एका साहित्य विषयक कार्यक्रमात ते बोलत होते. कोकण मराठी साहित्य परिषद आणि आनंद विश्वास गुरुकुल महाविद्यालय यांनी एका साहित्य विषयक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या विकास आणि संवर्धनासाठी राज्य सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती यावेळी उदय सामंत यांनी उपस्थितांना दिली. मंत्री सामंत यांनी लेखक व्हायची इच्छा व्यक्त केली. ‘मी मनाची तयारी केलेली आहे. ‘मुंबईत ते गुवाहाटी व्हाया सूरत’ हे पुस्तक मी लिहिणार आहे,’ असं सामंत यांनी सांगितलं.
SL/ML/SL