१३ ते २१ डिसेंबर दरम्यान NBT आयोजित ‘पुणे पुस्तक महोत्सव’
पुणे, दि. ८ : राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT) द्वारे १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव ’होणार आहे. भारतीय भाषांमधील पुस्तकांची ८०० दालने, लिटरेचर फेस्टिव्हल, बालकांसाठी चिल्ड्रेन कॉर्नर, लेखकांसाठी ऑर्थर कॉर्नर, दररोज पुस्तकांची प्रकाशने, सांस्कृतिक कार्यक्रम अशा एकापेक्षा एक कार्यक्रमांनी यंदाचा ‘पुणे पुस्तक महोत्सव’ रंगणार आहे. या महोत्सवाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महापालिका, डेक्कन एज्युकेशन सोसायटी (डीईएस) आणि समर्थ युवा फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले आहे.
पुणे पुस्तक महोत्सवा’चे हे तिसरे पर्व असून, दर वर्षी पुस्तक महोत्सव अधिकाधिक भव्य होत आहे. गेल्या वर्षी सर्व भारतीय भाषांमधील पुस्तकांची ७०० दालने होती. यांना ती संख्या वाढून ८०० झाली आहे. गेल्या वर्षी ‘लिटरेचर फेस्टिव्हल’ तीन दिवसांसाठी होता. त्याला पुणेकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. त्यामुळे यंदाचा लिटरेचर फेस्टिव्हल सहा दिवसांचा असून, त्यात तीन दिवस मराठी भाषेतील साहित्यिक, शैक्षणिक, वैचारिक कार्यक्रमांना राखीव आहे. उर्वरित तीन दिवस हे विविध भाषांतील साहित्यिक कार्यक्रमांसाठी आहेत. या ‘लिट फेस्टिव्हल’साठी नामांकित साहित्यिक, लेखक, पत्रकार, कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे.
SL/ML/SL