SBI मध्ये 996 पदांसाठी भरती

 SBI मध्ये 996 पदांसाठी भरती

मुंबई, दि. ५ : SBI ने स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी भरती 2025 ची अधिकृत घोषणा केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 996 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत भरती पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

एसबीआय बँक SO भरती 2025 ची अधिकृत सूचना 2 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झाली. त्याच दिवशी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे आणि ती 23 डिसेंबर 2025 पर्यंत सुरू राहील. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना सर्व पात्रता निकष आणि सूचना काळजीपूर्वक तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

उमेदवारांची निवड अनेक टप्प्यांमध्ये केली जाईल. यात पात्रतेनुसार शॉर्टलिस्टिंग, मुलाखत चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश आहे. जे उमेदवार सर्व टप्प्यांमध्ये यशस्वीरित्या उत्तीर्ण होतील, त्यांचाच अंतिम नियुक्तीसाठी विचार केला जाईल. अधिक माहितीसाठी sbi.bank.in या वेबसाईटला भेट द्या.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *