DRDO मध्ये 700 हून अधिक जागांसाठी भरती, पगार लाखाच्या घरात
मुंबई, दि. ४ :
डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गेनायजेशन (DRDO) ने CEPTAM 11 भरतीसाठी एक नोटिफिकेशन जारी केलं आहे. अर्ज प्रक्रिया 9 डिसेंबर रोजी अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर सुरू होणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था या भरती मोहिमेद्वारे सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंटमध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक बी (Senior Technical Assistant B) आणि तंत्रज्ञ ए (Technician A) ची 764 पदं भरणार आहे.
सीनियर टेक्निकल असिस्टंट-बी पदासाठी, उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान विषयात बॅचलर पदवी किंवा केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इत्यादी विषयांमध्ये डिप्लोमा किंवा अभियांत्रिकी/तंत्रज्ञान/कॉम्प्युटर सायन्समध्ये बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. टेक्निशियन बी साठी, दहावी किंवा समकक्ष उत्तीर्ण झालेले आणि संबंधित क्षेत्रात आयटीआय पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज करणाऱ्यांसाठी वयाची अट 18 ते 28 वर्षांपर्यंत आहे. आरक्षण असणाऱ्यांना नियमानुसार सूट मिळेल. तसंच पगार महिना 19,900 पासून ते 1,12,400 पर्यंत आहे. पदानुसार हा पगार असेल.
SL/ML/SL