विलंब शुल्कासह 31 डिसेंबरपर्यंत भरता येणार ITR
मुंबई, दि. 4 : 2024-25 साठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) तुम्ही अजुनही भरले नसतील, तर तुम्ही 31 डिसेंबर 2026 पर्यंत विलंब शुल्कासह ते भरू शकता. यानंतर तुम्ही रिटर्न भरू शकणार नाही, ज्यामुळे नोटीस येण्यासोबतच दंड आणि इतर कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
जर तुम्ही 5 लाखांपेक्षा कमी उत्पन्नाचे बिलेटेड इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल, तर तुम्हाला 1,000 रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. तर, 5 लाख किंवा त्याहून अधिक उत्पन्नावर 5,000 रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. आर्थिक वर्ष 2024-25 साठी कोणत्याही विलंब शुल्काशिवाय ITR भरण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर होती. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) सामान्य अंतिम मुदतीनंतर (म्हणजे 31 जुलै किंवा 31 ऑगस्ट, जे लागू असेल) भरत असाल, तर त्याला बिलेटेड रिटर्न म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, वेळेवर ITR भरले नाही, नंतर भरले तर त्याला बिलेटेड रिटर्न म्हणतात.
जर 31 डिसेंबरनंतर ITR दाखल केल्यास, तुमचा परतावा (परत मिळणारा कर) दावा केला जाणार नाही, कितीही परतावा मिळत असला तरी, तो सरकारकडे जाईल. इन्कम टॅक्स विभाग आता AI च्या मदतीने रिटर्नच्या डेटाचे विश्लेषण करतो. चुकीची माहिती दिल्यास नोटीस येऊ शकते. अशा परिस्थितीत, रिटर्न फाइल करताना चार्टर्ड अकाउंटंट (CA) किंवा टॅक्स एक्सपर्टचा सल्ला अवश्य घ्या.
SL/ML/SL