डिलाईल रोड येथील कबड्डी स्पर्धेला जल्लोषात सुरुवात
मुंबई, दि ४
न्यू शिवाजी क्रीडा मंडळाच्या ‘हिरक महोत्सवी’ वर्षानिमित्त डिलाईल रोड येथे कबड्डी स्पर्धेचे जल्लोषात प्रारंभ आमदार सुनील शिंदे यांच्या हस्ते टॉस उडवून करण्यात आला. या स्पर्धेत मुंबईतील विविध संघानी सहभाग घेतला. राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धा–२०२५ ‘कै. वसंत खानोलकर व कै. शरद खानोलकर स्मृतिचषक’ कबड्डी महोत्सवाचा उद्घाटन माझ्या हस्ते होत आहे. याचा मला मनापासून अभिमान वाटतो. तसेच या स्पर्धेचे आयोजकांचे मनापासून आभार मानून आपले कौतुक करतो. तसेच मैदानात दमदार झुंज देणाऱ्या सर्व कबड्डीपटूंना उत्कृष्ट खेळासाठी मनापासून शुभेच्छा देत असल्याची माहिती आमदार सुनील शिंदे यांनी याप्रसंगी आपल्या भाषणातून दिली. याप्रसंगी संस्थेच्या दिनदर्शिकेचे लोकार्पण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाखाप्रमुख गोपाळ खाडे आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.KK/ML/MS