ओंकार हत्तीसाठीच्या लढ्याला यश, वनतारामध्ये पाठवणे रहीत
मुंबई, दि. ३ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओंकार हत्तीला वनतारामध्ये पाठवण्याबिरोधान प्राणीप्रेमी एकवटले होते. आता या लढ्याला यश मिळाले आहे. ओंकार’ हत्तीबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीने महत्त्वपूर्ण असे आदेश दिला आहे. या निर्णयामुळे ओंकारच्या संरक्षणासाठी लढा देणाऱ्या अनेक सिंधुदुर्ग वासियांना तसेच प्राणी प्रेमींना मात्र दिलासा मिळाला आहे. उच्चाधिकार समितीने यासंदर्भात अधिक स्पष्टता दिली आहे. ओंकार हत्तीला खासगी मालकीच्या ‘वनतारा’ सुविधेकडे पाठवता येणार नाही; त्याऐवजी, त्याला महाराष्ट्र वनविभागाच्या ताब्यातील सुरक्षित आणि सरकारी व्यवस्थापन असलेल्या अधिवासात ठेवणे बंधनकारक असलयाचे त्यांनी सांगितले. ओंकार हत्तीला पकडल्यानंतर ज्या ठिकाणी ठेवले जाईल, ते केंद्र शासकीय (सरकारी) असणे अनिवार्य असल्याचे म्हटले आहे. कोल्हापूर वनविभाग विभागात समितीने ठरवलेल्या निकषांनुसार एकही सरकारी बचाव सुविधा उपलब्ध नसल्याचे विभागाच्या वतीने समितीसमोर मांडले. यामुळे ओंकारला पकडल्यानंतर कुठे ठेवायचे, हा प्रश्न जास्त गुंतागुंतीचा ठरला आहे.
ओंकार हत्तीला पकडल्यानंतर त्याला जंगलात सोडावे, सरकारी केंद्रात पुनर्वसन करावे की दीर्घकाळ काळजीसाठी ठेवावे, याचा अंतिम निर्णय येत्या दोन आठवड्यांत दिला जाणार आहे. हा निर्णय वैद्यकीय तपासणी, वर्तन अभ्यास आणि तज्ज्ञांच्या अहवालांच्या आधारे घेण्यात येईल. यासाठी वनविभागाला दोन आठवड्यांची मुदत देखील देण्यात आली आहे.
याचिकाकर्ते रोहन कांबळे यांनी ओंकारला पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, राधानगरी वन्यजीव अभयारण्य अथवा तिलारी संवर्धन क्षेत्र अशा विस्तृत आणि जैवविविधतेने संपन्न जंगलात स्थायिक करण्याची मागणी देखील केली आहे. या निर्णयाचे ओंकारप्रेमी आणि कार्यकर्त्यांनी आनंदाने स्वागत केले आहे. या महत्त्वपूर्ण घडामोडीमुळे ओंकार हत्तीच्या संरक्षणाचा लढा कोणतं नवीन वळण घेत हे पाहणे महत्वाचे ठरणारे आहे.
SL/ML/SL