१३ वर्षीय मुलाने गोळी झाडून दिला मृत्यूदंड- तालिबानचा भयंकर न्याय
काबूल,दि. ३ : अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतातील एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे. अवघ्या १३ वर्षांच्या मुलाकडून हत्या प्रकरणात दोषी आढळलेल्या मंगल नावाच्या तरुणाला जाहीररित्या मृत्यूदंड देण्यात आला आहे.. एका स्टेडियममध्ये दोषीवर गोळी झाडण्यात आली. त्यावेळी तिथे ८० हजार जण उपस्थित होते. ही सगळी गर्दी फाशीची मृत्यूदंडाची शिक्षा पाहायला जमली होती. तालिबानी राजवट असलेल्या अफगाणिस्तानात देण्यात आलेली शिक्षा अमानवीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या विरोधात असल्याचं संयुक्त राष्ट्राचे विशेष दूत रिचर्ड बेनेट यांनी म्हटलं.
मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या व्यक्तीवर १३ वर्षीय मुलाच्या कुटुंबातील १३ जणांना संपवल्याचा आरोप आहे. यातील ९ लहान मुलं होती. तालिबानी अधिकाऱ्यांनी आरोपीला शोधून काढलं. त्याचं नाव मंगल आहे. अफगाणिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी खटला चालला. न्यायालयानं मंगलला दोषी ठरवलं. यानंतर तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्लाह अखुंदजादा यांनी मंगलला मृत्यूदंडाची शिक्षा मंजूर केली.
SL/ML/SL