Ray Ban ने भारतात लाँच केला AI स्मार्ट चष्मा
मुंबई, दि. ३ : भारतामध्ये Ray Ban चे Meta Gen 2 AI चष्मे आजपासून उपलब्ध झाले आहेत. या नवीन पिढीतील स्मार्ट ग्लासेसमध्ये अत्याधुनिक 3K Ultra HD व्हिडिओ कॅप्चर, Ultra-wide HDR तंत्रज्ञान आणि सुधारित Meta AI अनुभव देण्यात आला आहे. जवळपास 8 तासांची बॅटरी लाइफ, फक्त 20 मिनिटांत 50% फास्ट चार्जिंग आणि चार्जिंग केससह 48 तास अतिरिक्त पॉवर मिळते. यामुळे हे ग्लासेस दिवसरात्र वापरण्यासाठी उपयुक्त ठरतात. हे चष्मे Ray-Ban India आणि देशभरातील प्रमुख आयवेअर रिटेलर्सकडे ₹39,900 पासून उपलब्ध आहेत.
यामध्ये वेफेरर, स्कायलर आणि हेडलाइनर या लोकप्रिय स्टाइल्ससह नवीन रंग पर्याय – शाइनी कॉस्मिक ब्ल्यू, शाइनी मिस्टिक व्हायोलेट आणि शाइनी अॅस्टेरॉईड ग्रे – उपलब्ध आहेत. Meta AI आता अधिक उपयुक्त बनले असून, “Hi Meta” कमांडद्वारे युजर्सना त्वरित उत्तरे, शिफारशी आणि क्रिएटिव्ह प्रॉम्प्ट्स मिळतात. तसेच, हिंदीसह प्रादेशिक भाषांमध्ये संवाद साधण्याची सुविधा देण्यात आली आहे, ज्यामुळे फोटो/व्हिडिओ कॅप्चर करणे, मीडिया कंट्रोल करणे आणि मेसेजेसला प्रतिसाद देणे अधिक सोपे झाले आहे.
नवीन फीचर्समध्ये सेलिब्रिटी AI व्हॉईसचा समावेश असून, युजर्स आता दीपिका पदुकोणच्या आवाजात Meta AI सोबत संवाद साधू शकतात. याशिवाय, लवकरच या ग्लासेसमध्ये UPI QR कोड पेमेंट्सची सुविधा उपलब्ध होणार आहे. ग्लासेस घालून QR कोडकडे पाहून “Hi Meta, Scan and Pay” म्हटल्यावर WhatsApp लिंक असलेल्या बँक खात्यातून पेमेंट पूर्ण होईल, ज्यामुळे दैनंदिन व्यवहार अधिक जलद आणि सुलभ होतील.
SL/ML/SL