भारताचा गौरवशाली बौद्ध धम्म महोत्सव – “महामानवास मानवंदना”

 भारताचा गौरवशाली बौद्ध धम्म महोत्सव – “महामानवास मानवंदना”

मुंबई, दि ३: न्याय, समता, बंधुता आणि मानवता यांचे प्रणेते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, जगातील सर्व वंचितांना स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाची नवी दिशा देणारे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कृतज्ञतापूर्वक मानवंदना देत, गत २५ वर्षांपासून मुंबईच्या हिरानंदानी भागात भव्य, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय जाणीवेने परिपूर्ण असा “महामानवास मानवंदना” हा ऐतिहासिक महोत्सव साजरा केला जात आहे.
हा महोत्सव आज भारतातील बौद्धिक आणि लोकशाही पुनर्जागरणाचा जागतिक मंच म्हणून ओळखला जातं आहे.

६०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्मगुरूंची उपस्थिती, भारताच्या सांस्कृतिक सामर्थ्याची घोषणाचा म्हणावी लागेल. थायलंड, श्रीलंका, म्यानमार, नेपाळ, तिबेट, भूतान, कोरिया, व्हिएतनाम
इत्यादी बौद्ध राष्ट्रांमधील ६०० वरिष्ठ बौद्ध महासंग मुंबईत आगमन करणार आहेत.
त्यांची उपस्थिती भारताच्या बौद्ध वारश्याची, शांततेची आणि विश्वबंधुत्वाच्या नेतृत्वाची पुनःप्रतीती घडवते.

६ डिसेंबर-चैत्यभूमीवर संविधाननिर्मात्याला आदरांजली
७ डिसेंबर-हिरानंदानी येथे ५०,००० ते ६०,००० धम्मअनुयायांची उपस्थिती म्हणजे हिरानंदाणी परिसर धम्ममय होणार.

हा जनसागर स्पष्ट संदेश देतो आहे की, “समतेचा धम्म आणि संविधानाचा मार्ग – हाच भारताचा भविष्यमार्ग!”

धम्म — संविधान — राष्ट्रीय एकता : यांचा अद्वितीय संगम म्हणजेच या दिवशी विविध प्रबोधनकारी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रामुख्याने.., प्रेरक धम्मदेशना व साक्षीभाव ध्यान, भारतीय संविधान, मानवाधिकार आणि सामाजिक न्यायावर व्याख्यान, समता आणि करुणेवर आधारित सांस्कृतिक सादरीकरणे, सर्व आगंतुकांसाठी विनामूल्य भोजन व्यवस्था, शास्त्र, विज्ञानवाद आणि मानवी मूल्यांचा प्रसार आणि “जयभीम पॅन्थर” चित्रपटाचा मोफत शो.
हजारो स्वयंसेवक या महोत्सवात सेवेचे सौख्य अनुभवणार आहेत।

या कार्यक्रमाचे अध्यक्ष जागतिक बौध्द धम्मगुरु पूजनीय भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो असणार असून मुख्य सूत्रधार म्हणून.., भदंत संघप्रिय थेरो, भदंत शिलबोधी थेरो, भदंत आर. आनंद थेरो, भदंत शांतिरत्न महाथेरो, भदंत के.आर. लामा, भदंत पद्मपाणी थेरो, भदंत बोधिशील थेरो, भदंत करुणासागर थेरो, भदंत बोधिधम्म थेरो, भदंत निर्वाण थेरो आणि भदंत उपाली थेरो
यांची मान्यवर उपस्थिती प्रेरणादायी ठरणार आहे.

“महामानवास मानवंदना हा केवळ धार्मिक कार्यक्रम नाही,
तर बौद्ध धम्माच्या जागतिक पुनरुत्थानाचे, आणि वंचित समाजाला न्यायपूर्ण जीवन देण्याचे आंदोलन आहे.” असे प्रेरक विचार पूजनीय भन्ते शिलबोधी थेरो यांनी व्यक्त केले.

“करुणा, समता आणि लोकशाही मूल्यांसाठी निर्भयतेने पुढे चला.
बाबासाहेबांचे समतामूलक भारतस्वप्न, हेच आपले राष्ट्रीय ध्येय!” असा संदेश आयोजकांच्या वतीने देशवासीयांना संविधान आणि मानवतेच्या संरक्षना साठी दिला.

जातभेद आणि अन्यायमुक्त समाजनिर्मिती, जागतिक बौद्ध धम्म चळवळीचा सुदृढ विस्तार,
संविधाननिष्ठ, प्रगत आणि समतामूलक राष्ट्राची उभारणी करणे या महोत्सवाचे प्रेरक ध्येय असल्याचे प्रसिद्धी प्रमुख डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *