सह्यगिरींची पुनर्भेट….
किरण सहस्त्रबुद्धे
बोरिवली, मुंबई : सह्यगिरी ट्रेकर्स बोरिवली ग्रुपची ४० वर्षांनंतरची पुनर्भेट राष्ट्रीय उद्यानात उत्साहात पार पडली. दापोली, नाशिक, पेण, डोंबिवली व मुंबईतील ज्येष्ठ व तरुण गिर्यारोहक पुन्हा एकत्र आले. सभेची सुरुवात दिवंगत सहकाऱ्यांच्या श्रद्धांजलीने झाली. मकरंद मुळे यांनी दुसऱ्या पिढीची वाटचाल सांगितली, तर संजय चौगुले यांनी सह्यगिरीची स्थापना व “जोगिन शिखर” मोहिमेच्या आठवणी उजाळल्या.

अविनाश खुळे, नंदिनी लोटलीकर, मेधा बापट, सूर्यकांत महाडिक, विनोद पटेल, निलेश शहा आदींनी आठवणी रंगवत वातावरण रंगवले. दुपारनंतर गाण्यांच्या मैफिलीने जुन्या सहलींचा रंग पुन्हा खुलला आणि सह्यगिरी संस्था पुनरुज्जीवनाचा निर्णय घेण्यात आला. ७४ वर्षीय विनोद पटेल यांनी नवीन उपक्रमांसाठी पुढाकार स्वीकारला.

नंदिनी लोटलीकर लिखित “सह्यगिरी ट्रेकर्सची ४० वर्षे” हा लेख या भेटीचा आधार ठरला. १३ ऑक्टोबर १९८५ हा सह्यगिरी ट्रेकर्सच्या स्थापनेचा दिवस असल्याची पुनःप्रचिती झाली. ही आठवण पुन्हा हरवू नये म्हणून निलेश शाह यांनी पुढाकार घेतला व अभय तळपदे आणि मी — अनंत बेदरकर — यांनी त्यांना साथ देत हे आयोजन यशस्वी केले.
भावना एकच — “जुने मित्र भेटले… आणि तरुणपण पुन्हा जागं झालं.”ML/ML/MS