बांगलादेशी तृतीयपंथी, त्यांना आश्रय देणार्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा.
-कृष्णा आडेलकर यांचा इशारा
मुंबई, दि १:
देशाला व महाराष्ट्राला घातक असलेले घुसखोर बांगलादेशी व्यक्ती ( तृतीयपंथी) व त्यांना आश्रय देणार्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करु,असा इशारा घाटकोपर (पश्चिम )येथील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा मनोहर आडेलकर यांनी सोमवारी दिला.ते मुंबई प्रेस क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
कृष्णा आडेलकर म्हणाले,मुंबईत बांग्लादेशातून आलेल्या बांग्लादेशी तृतीयपंथी यांची संख्या मोठ्या प्रमाणात आले.त्यांच्या टोळ्याच्या टोळ्या मुंबईत येत आहेत.त्यामुळे मुंबईतील खर्या तृतीयपंथीं यांना मारहाण करणे, धमकावणे अशाप्रकारचे अन्याय होत आहे.याचबरोबर बांगलादेशी तृतीयपंथी देह विक्रीचा व्यवसाय खुलेआम रस्त्यावर करीत असल्याचे दिसते.रस्त्यावरुन येणारे-जाणारे,पुरुष ,तरुण मुले,शाळकरी मुले याच्यावर याचा वाईट परिणाम होताना दिसून येत आहे.मुंबईत बाबु खान उर्फ ज्योती खान हा बांग्लादेशी तृतीयपंथीय याची २० घरे आहेत.त्याच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.त्याच्याकडे एक हजारहून अधिक बांग्लादेशी तृतीयपंथीय आहेत.
याचबरोबर बांग्लादेशी तृतीयपंथी हे लोकल रेल्वेमध्ये दादागिरी व गुंडगिरी करुन प्रवाश्यांवर जबरदस्ती करीत आहेत.त्यांच्याकडून पैसे उकळ्याचे काम करतात.तसेच बांग्लादेशी पुरुष हे तृतीयपंथी यांची वेशभूषा करुन किन्नर बनून वावरत आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनाने बांग्लादेशी तृतीयपंथी यांच्यावर व त्यांना आश्रय देणार्यावर कारवाई करावी
ही कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.KK/ML/MS