‘द फोक आख्यान’चे संगीतकार देणार मराठी चित्रपटाला संगीत
मुंबई, दि. १ : लोककलेला मानाचा मुजरा करत संपूर्ण राज्यभरात लोकप्रिय ठरलेल्या ‘द फोक आख्यान’ च्या टीमकडे चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शक यांच्या ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या सिनेमा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला ‘द फोक आख्यान’ची टिम संगीत देणार आहे. या चित्रपटासाठी त्यांनी पाच दमदार गाणी तयार केली आहेत. ‘द फोक आख्यान’च्या हर्ष-विजय यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांना गीतकार ईश्वर ताराबाई अंधारे यांचे शब्द लाभले आहेत. त्यामुळे आता ‘द फोल्क आख्यान’ची संगीतशैली आणि हेमंत ढोमे यांच्या कथा सांगण्याच्या ताकदीचा संगम पाहाण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला की,”क्रांतिज्योतीसाठी ‘द फोक आख्यान’ यांची निवड केली, कारण त्यांची ऊर्जा, लोककलेविषयीची समज, त्यांचे जमिनीशी असलेले नाते या चित्रपटाच्या विषयाला अगदी जुळणारे आहे. या पाच गाण्यांतून मराठी मातीतली ममता व्यक्त होईल. त्यांच्या प्रत्येक सादरीकरणात असलेली ताकद, लय आणि प्रामाणिकपणा हा त्यांचा सर्वात मोठा गुण असून आमच्या चित्रपटासाठी आम्हाला अशीच उर्जा आणि असाच ताजा दृष्टिकोन हवा होता.”
1 जानेवारी 2026 ला ‘शाळेच्या आठवणींना पुन्हा उजाळा देणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट प्रदर्शीत होत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर या चित्रपटात मुख्यध्यापकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. असून अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर या कलाकारांसोबतच मराठी चित्रपटात पहिल्यांदाच प्राजक्ता कोळी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
SL/ML/SL