या दिवशी राज्यातील सर्व शाळा राहणार बंद
पुणे, दि. १ : महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी 5 डिसेंबर रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. पुण्यात आज पार पडलेल्या बैठकीत मुख्याध्यापक महामंडळाने निर्णय घेतला आहे. हे आंदोलन मुख्यतः शिक्षक पात्रता परीक्षा (TET) सक्ती, संच मान्यता (staffing approval) संदर्भातील शासन निर्णय रद्द करण्यासाठी आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी आहे. या आंदोलनामुळे राज्यातील शाळा बंद राहणार आहे. राज्यव्यापी शाळा बंदचा पुण्यातून एल्गार करण्यात आला आहे. मुख्याध्यापक महामंडळाने राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे.
येत्या ५ डिसेंबर रोजी राज्यातील शाळा बंद ठेवून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समिती, शिक्षक भारती, मुख्याध्यापक महामंडळ आणि इतर 100 हून अधिक संघटना या आंदोलनात सामील होणार आहेत.
मागण्या
राज्यातील 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये
15 मार्च 2024 रोजीचा संचमान्यता शासन निर्णय रद्द करून जुन्या निकषाप्रमाणे संचमान्यता करण्यात यावे
शिक्षणसेवक योजना रद्द करून सर्व शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करावी.
SL/ML/SL