ढोले पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रा. विठ्ठल गायकवाड यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य कार्य गौरव’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

 ढोले पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रा. विठ्ठल गायकवाड यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य कार्य गौरव’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

पुणे, दि १: अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर, महाराष्ट्र यांच्या वतीने जागतिक शिक्षक दिनानिमित्त आयोजित राज्य व राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा 2025,ट्विन फाउंटन,गोवा येथे 30 नोव्हेंबर 2025 रोजी भव्य स्वरूपात पार पडला. या सोहळ्यात ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सचे प्राचार्य प्रा. विठ्ठल गायकवाड यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य कार्य गौरव’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा सन्मान अविष्कार फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार आणि एमडी देसाई वायुसेना व सामाजिक कार्यकर्ते मान्यवर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील प्राचार्य गायकवाड यांच्या सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कार्याची ही अधिकृत दखल मानली जात आहे.
प्रा. गायकवाड हे सलग वीस वर्षे प्राचार्य पदावर कार्यरत असून, शैक्षणिक व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शिक्षक नेतृत्व या क्षेत्रांत त्यांनी ठसा उमटवला आहे. यापूर्वीही त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.संत साहित्यातील अभ्यासक म्हणूनही त्यांची स्वतंत्र ओळख असून, ‘संत तुकाराम महाराजांचे अभंगातून व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर त्यांचे पीएचडी संशोधन कार्य सुरू आहे. त्यांच्या लेखनाला सकाळसारख्या दैनिकांनी तसेच नामांकित मासिकांत रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले आहेत.

प्राचार्य गायकवाड हे मूळचे पुणे जिल्ह्यातील मलठण येथील असून, त्यांच्या कार्याबद्दल शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय चेअरमन सागर ढोले पाटील सर यांनीही या यशाबद्दल प्राचार्य गायकवाड यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या कार्याला नेहमीच संस्थेचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभत असल्याचे सांगितले.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *