पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
पुणे, दि २८:-
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवन व समता भूमी येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर महात्मा फुले वाडा येथील त्यांच्या पुतळ्यास पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
काँग्रेस भवन येथील कार्यक्रमात बोलताना अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘समतेचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाला घरातूनच सुरूवात केली. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवल्यामुळे महिलांना शिक्षणाची कवाडे उघडी झाली आणि आज सर्व क्षेत्रात महिला समर्थपणे काम करीत आहेत. महात्मा फुलेंचे विचार काँग्रेस पक्षाने पुढे चालू ठेवल्याने मुलींच्या शाळा मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या. मुली अर्थांजन करू लागल्या. शिक्षणामुळे आज मुली सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत.
सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरांच्या जोरखंडातून समाजातील वंचित घटकांची सुटका केली. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून सगळ्यात पहिली सामुहिक शिवजंयती साजरी करण्याचा व छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा लिहिण्याचा मान महात्मा फुले यांचा आहे. ‘आज ही महात्मा फुले यांचे विचार समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतात’. महात्मा फुलेंना जर खरे अभिवादन करायचे असेल तर त्यांचे विचार व त्यांनी केलेले संघर्षमय कार्य आपल्याला कृतीतून उतरावे लागेल.’’
यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, यांच्या समवेत माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, माजी महापौर कमल व्यवहारे, वीरेंद्र किराड, अजित दरेकर, अविनाश बागवे, प्राची दुधाने, जनसेविका रेखा अगरवाल, सिमा सावंत, इंदिरा बागवे, उषा राजगुरू, अनिता धिमधिमे, ॲड. राजश्री अडसूळ, ज्योती परदेशी, सुरेखा खंडागळे, संजय आगरवाल, अक्षय माने, हेमंत राजभोज, सचिन भोसले, फिरोज शेख, दिलीप लोळगे, सुरेश नांगरे, राजू कांबळे आदी उपस्थित होते.KK/ML/MS